Wednesday, 16 June 2021

राधा कृष्णावरी भाळली

राधा कृष्णावरी भाळली, 
राधा कृष्णावरी भाळली, 
कुजबुज उठली गोकुळी
कुजबुज उठली गोकुळी
राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली

*स्वर-आशा भोसले*
अमृतवृक्षी फुलला मोहोर, 
कोकीळकंठी फुटला सुस्वर 
अमृतवृक्षी फुलला मोहोर, 
कोकीळकंठी फुटला सुस्वर

कुंजवानातून, फुलाफुलांतून...
कुंजवानातून, फुलाफुलांतून, 
नवलकथा दरवळली
राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली

*सौजन्य-रविंद्र झांबरे*
वायू वेगे सुगंधवा..र्ता, 
कालिंदीच्या कानी पडता 
वायू वेगे सुगंधवा..र्ता, 
कालिंदीच्या कानी पडता

हरीभक्तीची ओढ तियेची...
हरीभक्तीची ओढ तियेची, 
नीलजळी थयथयली
राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली
💃🕺💃🕺💃🕺

अमर प्रीतीचे गीत लाघवी, 
हरी अधरीची वेणू वाजवी
अमर प्रीतीचे गीत लाघवी, 
हरी अधरीची वेणू वाजवी

राधामोहन बघण्या मिलन...
राधामोहन बघण्या मिलन, 
इंद्रपुरी अवतरली
राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली
कुजबुज उठली गोकुळी
कुजबुज उठली गोकुळी

राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली
राधा कृष्णावरी भाळली
धन्यवाद 🙏

पोरी पिंगा ग पोरी पिंगा

🌷स्वर-उषा मंगेशकर🌷
१+२)हं हं हं...हं हं हं...हं हं हं..हं हं हं
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा 
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
१)फेटा बांधल्याला भाऊ माझा ग 
जावई तुझा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
झोप चाळिवली पोरी पिंगा 
हं हं हं...हं हं हं
२)शालू नेसल्याली भैन माझी ग 
सून तुझी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
मागं घालिवली पोरी पिंगा 
१+२)पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा
१)भाऊ माझा ग, शोभं राजा ग, 
अग जा जा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
मला बोलिवली पोरी पिंगा 
हं हं हं...हं हं हं
२)तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, 
रूप हेकणं ग पोरी पिंगा
भैन माझी ग लेक इंद्राची 
कोर चंद्राची पोरी पिंगा 
१+२)पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा
१)तुझ्या भैनीचं नाक नकटं ग 
त्वांड चपटं ग पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा 
पळती थरारा सारे पिंगा 
हं हं हं...हं हं हं
२)भाऊ तुझा ग भितो झुरळाला, 
काळ्या उंदराला पोरी पिंगा
भैन माझी ग जशी कोकिळा 
गाते मंजुळा पोरी पिंगा 
१+२)पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा
१)तुझ्या भैनीचं काय नरडं ग 
कावळं वरडं ग पोरी पिंगा
अशा भैनीला कोण आणणार 
कशी नांदणार पोरी पिंगा 
हं हं हं...हं हं हं
२)भैन माझी ग जाई बावरून 
घेई सावरून पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, 
लुगडं नेशिवलं पोरी पिंगा 
१+२)पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏

गंगा जमुना दोघ्या बहिणी

💃भन्नाट कोळीगीत🕺
🚩मराठी बाणा🚩
💃🕺💃🌹💃🕺💃
गंगा-जमुना दोघ्या बयनी 
गो पानी झुलझुल व्हाय
गंगा-जमुना दोघ्या बयनी 
गो पानी झुलझुल व्हाय
गंगा-जमुना दोघ्या बयनी 
गो पानी झुलझुल व्हाय
गंगा-जमुना दोघ्या बयनी 
गो पानी झुलझुल व्हाय
हे,दर्याकिनारी एक बंगला 
गो पानी जाय-जुई-जाय
दर्याकिनारी एक बंगला 
गो पानी जाय-जुई-जाय
दर्याकिनारी एक बंगला 
गो पानी जाय-जुई-जाय
दर्याकिनारी एक बंगला 
गो पानी जाय-जुई-जाय
माशांनी मारलाय दणका 
गो पानी तलाला जाय
माशांनी मारलाय दणका 
गो पानी तलाला जाय
माशांनी मारलाय दणका 
गो पानी तलाला जाय
माशांनी मारलाय दणका 
गो पानी तलाला जाय
*स्वर-बालकराम वरलीकर व मंडळी*
कोल्याची पोर एक शोभेची तया उबीच हाय
कोल्याची पोर एक शोभेची तया उबीच हाय
कोल्याची पोर एक शोभेची तया उबीच हाय
कोल्याची पोर एक शोभेची तया उबीच हाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्‍यानी जाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्‍यानी जाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्‍यानी जाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्‍यानी जाय
अंगान्‌ चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
अंगान्‌ चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
अंगान्‌ चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
अंगान्‌ चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
हे, नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय
नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय
नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय
नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर,
नवरीचा बापुस कवटा चोर
आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर, 
नवरीचा बापुस कवटा चोर
आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर, 
नवरीचा बापुस कवटा चोर
आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर, 
नवरीचा बापुस कवटा चोर....
करवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या 
म्हायेरा जावालं सांजवलं
करवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या 
म्हायेरा जावालं सांजवलं
करवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या 
म्हायेरा जावालं सांजवलं
करवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या 
म्हायेरा जावालं सांजवलं....
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
💃🕺💃🌹💃🕺💃

जरा थांब ग पोरी

*चित्रपट-तुमचं आमचं जमलं*
*स्वर-उषा मंगेशकर महेंद्र कपूर*
जरा थांब ग पोरी 
जरा थांब ग पोरी न् जाऊ नको दुरी 
रस्ता तुझा धरला 
जरा थांब ग पोरी न् जाऊ नको दुरी 
रस्ता तुझा धरला 
तुला सांगु मी किती वाटते भिती 
न जीव माझा घाबरला 
तुला सांगु मी किती वाटते भिती 
न जीव माझा घाबरला 
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
मी लाजुन झाले चुर पण मनात वाटते खुशी 
माझ्या तरुण पणाची खूण चारचौघात दाखवू कशी 
चल दोघंबी जाऊ अन् निरखून पाहू
चल दोघंबी जाऊ निरखून पाहू येतीस का घरला 
ईस्स,सांगु मी किती वाटते भिती 
न जीव माझा घाबरला
तुला सांगु मी किती वाटते भिती 
न जीव माझा घाबरला
💃💃🕺💃🌹💃🕺💃🕺
तुझं टपोरं डोळं ग जणू दिसत्यात हरणीवाणी...
हे, तुझं टपोरं डोळं ग जणू दिसत्यात हरणीवाणी 
तुझं गाल गोरं गोरं ग जशी फुलली गुलाबदाणी 
जरा दम तरी धरा (अहाहा) मागंबी सरा(अगं व्वा)
जरा दम तरी धरा न मागंबी सरा पदर बघा चुरला 
ई हा, उभार बांधा गोरा गोरा खांदा मनात लय भरला 
तुझा उभार बांधा गोरा गोरा खांदा मनात लय भरला 
🙏मराठीची आस धरा मित्रहो🙏
नका करू हो असली घाई जरा उद्याला राहूद्या थोडं 
तुमचं चावट वागणं बाई पर अंगाला लागतंय गोड 
ग जरा लाडात येना मला मिठीत घेना 
जरा लाडात येना न्  मिठीत घेना मदन संचरला 
ईस्स,सांगु मी किती वाटते भिती 
न जीव माझा घाबरला
ई हा, उभार बांधा गोरा गोरा खांदा मनात लय भरला 
गं थांब ग पोरी जाऊ नको दुरी रस्ता तुझा धरला 
गं थांब ग पोरी जाऊ नको दुरी रस्ता तुझा धरला 
तुला सांगु मी किती वाटते भिती 
न जीव माझा घाबरला 
तुला सांगु मी किती वाटते भिती 
न जीव माझा घाबरला 
धन्यवाद 🙏

Tuesday, 1 June 2021

मेरी तुझे केस लांब लांब

❤मेरी तुझे केस❤
🕺💃🕺💃🕺💃🕺💃
हे,मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
हे,पापा बघितान पापा बघितान
डोले फारूनशान रागे भरतान 
पापा बघितान पापा बघितान
डोले फारूनशान रागे भरतान 
हे, मेरीने लावली ओठाला लाली 
मेरी दिसते गिता बाली 
मेरीने लावली ओठाला लाली 
मेरी दिसते गिता बाली 
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
*वसईकर आणि मंडळी*
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
पापा बघितान पापा बघितान
डोले फारूनशान रागे भरतान 
पापा बघितान पापा बघितान
डोले फारूनशान रागे भरतान 
हे, मेरीने लावलाय डोक्यास केवडा
मेरीचा बापुस पक्का बेवडा हा
मेरीने लावलाय डोक्यास केवडा
मेरीचा बापुस पक्का बेवडा
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
पापा बघितान पापा बघितान
डोले फारूनशान रागे भरतान 
पापा बघितान पापा बघितान
डोले फारूनशान रागे भरतान 
मेरीने लावल्या केसात पिना 
मेरी दिसते माला सिन्हा 
मेरीने लावल्या केसात पिना 
मेरी दिसते माला सिन्हा 
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
मेरी तुझे केस लांब लांब लांब
जवल नको येऊ तुझे पापा बघितान
💃🕺💃🕺💃🕺💃🕺

नाकी डोळी छान रंग

🌹राम राम गंगाराम🌹
        🌹लावणी🌹
आ आ आ 
नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान 
नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान 
त्यात आलं तरुणपण मिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
🌹स्वर-उषा मंगेशकर🌹
जाऊ चला हो रंग महाली 
शेजेवरती फुले पसरली 
मर्जी तुम्हावर बहाल केली हो 
मर्जी तुम्हावर बहाल केली...
नटून मी आले बघू नका वरखाली 
गगग धडा पहिला गिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
तुमच्या संग होऊन दंग उधळूया हो प्रितीत रंग 
मी राधा तुम्ही माझे श्रीरंग 
मी राधा तुम्ही माझे श्रीरंग...
गोड गोड पावा मला वाजवून दावा 
मनातली विच्छा माझी पुरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
💃💃💃🌹💃💃💃
तळमळते मज चैन पडेना 
डोळ्यावरची धुंदी उडेना 
जवळ असुनही काही घडेना 
जवळ असुनही काही घडेना...
सुटलं गं वारं आज थंडगार गार 
खेळात या हो मला हरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
🙏धन्यवाद🙏

अय्यो रामा रामा लफड्यात

❤भन्नाट युगूलगीत❤
🌹चित्रपट-चंगु मंगू🌹
🚩मराठी बाणा🚩
ना निन्नाची बा रामन्ना तू रती नी मी कामन्ना
आधी साडी नी चोळी आण ना
मग जीवाची राणी म्हण ना
अय्यो रामा रामा लफड्यात फसलो ना
अय्यो रामा रामा झोपड्यात चल ये ना 
ना निन्नाची बा रामन्ना तू रती नी मी कामन्ना
आधी साडी नी चोळी आण ना
मग जीवाची राणी म्हण ना
अय्यो रामा रामा लफड्यात फसलो ना
अय्यो रामा रामा झोपड्यात चल ये ना 
🌷स्वर-अनुराधा पौडवाल,सचीन🌷
दिलाची रुक्मिणी तू गं तुझा कन्हैय्या मी 
प्रेमानं वेडा झाला.. तुझाच हा स्वामी 
अय्यो,लाडीगोडीला असल्या नाही भुलायचे मी 
गोपीच्या मागुन फिरशी नमुना तू नामी 
तुझ्यासाठी मी गरगर फिरलो...
तुझ्यासाठी मी गरगर फिरलो 
खोल पाण्यात उगाच शिरलो 
मी रं बनुन मासोळी आले 
तुझ्या जाळ्यात अडकून गेले 
अय्यो रामा रामा लफड्यात फसलो ना
अय्यो रामा रामा झोपड्यात चल ये ना 
ना निन्नाची बा रामन्ना तू रती नी मी कामन्ना
आधी साडी नी चोळी आण ना
मग जीवाची राणी म्हण ना
अय्यो रामा रामा लफड्यात फसलो ना
अय्यो रामा रामा झोपड्यात चल ये ना 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
जवानी रसरसलेली अशी नशीली तू 
गंधानं मोहरलेली.. जशी चमेली तू 
अय्यो,सुंगध माझा ताजा लुटून घे राजा 
तुझ्याचसाठी झुरतो खुळा हा जीव माझा 
आता नको हे वरवर बोलू....
आता नको हे वरवर बोलू
जीवाभावाच कोडं खोलू 
तुझ्या नजरेनेकेली जादू घे रे मिठीत नकोस लाजू 
अय्यो रामा रामा लफड्यात फसलो ना
अय्यो रामा रामा झोपड्यात चल ये ना 
ना निन्नाची बा रामन्ना तू रती नी मी कामन्ना
आधी साडी नी चोळी आण ना
मग जीवाची राणी म्हण ना
अय्यो रामा रामा झोपड्यात चल ये ना 
अय्यो रामा रामा लफड्यात फसले ना
अय्यो ला ला ला ला, ला ला ला ला, 
अय्यो ला ला ला ला, ला ला ला ला 
🙏धन्यवाद 🙏