*चित्रपट-तुमचं आमचं जमलं*
*स्वर-उषा मंगेशकर महेंद्र कपूर*
जरा थांब ग पोरी
जरा थांब ग पोरी न् जाऊ नको दुरी
रस्ता तुझा धरला
जरा थांब ग पोरी न् जाऊ नको दुरी
रस्ता तुझा धरला
तुला सांगु मी किती वाटते भिती
न जीव माझा घाबरला
तुला सांगु मी किती वाटते भिती
न जीव माझा घाबरला
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
मी लाजुन झाले चुर पण मनात वाटते खुशी
माझ्या तरुण पणाची खूण चारचौघात दाखवू कशी
चल दोघंबी जाऊ अन् निरखून पाहू
चल दोघंबी जाऊ निरखून पाहू येतीस का घरला
ईस्स,सांगु मी किती वाटते भिती
न जीव माझा घाबरला
तुला सांगु मी किती वाटते भिती
न जीव माझा घाबरला
💃💃🕺💃🌹💃🕺💃🕺
तुझं टपोरं डोळं ग जणू दिसत्यात हरणीवाणी...
हे, तुझं टपोरं डोळं ग जणू दिसत्यात हरणीवाणी
तुझं गाल गोरं गोरं ग जशी फुलली गुलाबदाणी
जरा दम तरी धरा (अहाहा) मागंबी सरा(अगं व्वा)
जरा दम तरी धरा न मागंबी सरा पदर बघा चुरला
ई हा, उभार बांधा गोरा गोरा खांदा मनात लय भरला
तुझा उभार बांधा गोरा गोरा खांदा मनात लय भरला
🙏मराठीची आस धरा मित्रहो🙏
नका करू हो असली घाई जरा उद्याला राहूद्या थोडं
तुमचं चावट वागणं बाई पर अंगाला लागतंय गोड
ग जरा लाडात येना मला मिठीत घेना
जरा लाडात येना न् मिठीत घेना मदन संचरला
ईस्स,सांगु मी किती वाटते भिती
न जीव माझा घाबरला
ई हा, उभार बांधा गोरा गोरा खांदा मनात लय भरला
गं थांब ग पोरी जाऊ नको दुरी रस्ता तुझा धरला
गं थांब ग पोरी जाऊ नको दुरी रस्ता तुझा धरला
तुला सांगु मी किती वाटते भिती
न जीव माझा घाबरला
तुला सांगु मी किती वाटते भिती
न जीव माझा घाबरला
धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment