Wednesday, 16 June 2021

नववधू प्रिया मी

🌷लता मंगेशकर🌷
नववधू प्रिया मी बावरते
नववधू प्रिया मी बावरते
लाजते पुढे सरते, फिरते
नववधू प्रिया मी बावरते
नववधू प्रिया मी बावरते...
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
कळे मला तू..प्राण सखा जरी
कळे तूच आधार सुखा जरी
कळे मला तू.. प्राण सखा जरी
कळे तूच आ..धार सुखा जरी
तूज वाचूनि संसार फुका जरी ई ई ई
मन जवळ यावया गांगरते
नववधू प्रिया मी बावरते...
मला येथला,लागला लळा
सासरी निघता,दाटतो गळा
मला येथला,लागला लळा
सासरी निघता,दाटतो गळा
बाग बगीचा येथला मळा आ आ आ 
सोडीता कसे,मन चरचरते
नववधू प्रिया मी बावरते...
जीव मनीचा,मनी तळमळे
वाटे बंधन,करुनि मोकळे
जीव मनीचा,मनी तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे,तुज जवळ पळे ऐ ऐ ऐ
परि काय करु ? उरी धडधडते
नववधू प्रिया मी बावरते...
आता तुच भय,लाज हरी रे
धीर देऊनि,ने नवरी रे
आता तुच भय,लाज हरी रे
धीर देऊनि,ने नवरी रे
भरो..त भरतील नेत्र जरी रे ऐ ऐ ऐ
कळ,पळभर मात्र खरे घर ते
कळ,पळभर मात्र खरे घर ते
लाजते पुढे सरते, फिरते
नववधू प्रिया मी बावरते
नववधू प्रिया मी बावरते
🙏 धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment