Friday, 29 July 2016
Thursday, 21 July 2016
तमसो मा ज्योतीर्गमय...!!!
मानव समाज हा नैसर्गिक रित्या निर्माण झाला आहे . प्रत्येक व्यक्ती चे स्वाभाविक गुणधर्म भिन्न असल्याने कोणत्याही उत्कृष्ट समाजव्यवस्थेत वर्ग असणे अपरीहार्य ठरते . भारतीय समाजाचा विचार करता स्थुलमनाने हे वर्ग चार आहेत.
ज्यांना जन्मानेच उत्तम बुध्दिमत्ता लाभलेली असते आणि या जगातल्या वस्तूंची आसक्ती कमी असते . अशा लोकांचा " ब्राह्मण वर्ग " होय .
ज्यांना जन्मापासुन उत्तम शरीर प्रकृती मिळालेली असते , अंगी निर्भयता , धैर्य व धाडस हे गुण असतात आणि ज्यांना ऐश्वर्य भोगण्याची हौस असते तो " क्षत्रिय वर्ग "
ज्यांना व्यवहार अधिक समजतो , हिशोबाची गुंतागूंत सहज लक्षात येते , ज्यांना आर्थिक उलाढाल करण्याची हौस असते तो " वैश्य वर्ग "
ज्यांना स्वाभाविक पणे बुध्दिमत्ता कमी लाभलेली असते , ऐश्वर्य मिळवण्याची हौस नसते , कला प्राप्त करण्याची पात्रता नसते , सांगितलेले काम करण्याची केवळ कुवत असते तो " शुद्र वर्ग "
कोणत्याही सुसंस्कृत जीवन जगणार्या समाजात अप्रत्यक्षपणे का होईना हे चार वर्ग असतात हे निर्विवाद सत्य आहे . त्यपैकी कोणताही वर्ग श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो . प्रत्येक वर्ग खुला असल्याने परस्परात परके पणाच्या भिंती नसतात .
उदा. ब्राह्मणाच्या घरात जर अगदी सामान्य बुध्दिचा मुलगा जन्माला आला तर तो शुद्र गणला जातो तसेच एखाद्या शुद्र कर्म करणार्या जर बुध्दिमान मुलगा जन्माला आला तर तो ब्राह्मण वर्गात जाऊ शकतो ...!!!
माणूस कोणत्याही वर्गातील असला तरी तो व्यक्ती या दृष्टीने समान असतो . म्हणून माणूस जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती आत्मज्ञानाची अधिकारी असल्याने ती कोणत्या वर्गात जन्मली हे महत्वाचे नाही . तत्वतः हे जरी खरे असले तरी व्यवहारात माणूस ईतक्या विवेकाने वागत नाही . तो स्वतः श्रेष्ठ कनिष्ठाच्या कल्पना निर्माण करुन वर्गांना जाती बनवून सामाजिक जीवन कुजवून टाकतो ...!!!
एकेकाळी ब्राह्मण वर्गाला समाजात फार श्रेष्ठ पणा मिळाला , नंतर क्षत्रिय वर्गाला पुढे वैश्य म्हणजे व्यापारी पैसे वाल्यांना मोठे पणा मिळाला . आता शुद्र म्हणजे कामगारांना अत्यंत महत्व मिळाले आहे .
कोणत्याही एकाच वर्गाला समाजात श्रेष्ठ पणा मिळाला मग तो ब्राह्मण असो की शुद्र , समाजातील समतोल नष्ट होऊन आपसातील द्वेष , मत्सर , वैर वाढत जाते . नवीन समस्या निर्माण होऊन सामाजिक जीवन त्रस्त होते .
उदा. सध्याच्या राष्ट्रीय समाजात डॉक्टर वर्ग , ईंजीनीअर वर्ग , वकील व कारकून वर्ग आढळतात . समजा या प्रत्येक वर्गाची वेगवेगळी जात निर्माण झाली तर त्यांचे सामाजिक जीवन किती हीन पातळीवर जाईल हे सांगायला हवे का ...???
" जन्मना जायते शुद्र: । संस्कारीतः द्वीज उच्चते ।।"
" चातुर्वर्ण्य मया सृष्टं । गुण-कर्म विभागश: ।। "
या सुखा कारणे ...!!!
शाश्वताचा शोध घेणे हेच माणसाच्या बुध्दिचे वैशिष्ट्य आहे . चिंतनशीलता हा या विश्वाचा उगम आहे . या विश्वाला दोन टोके आहेत , एका टोकाला सर्व मानवांच्या कल्पना पलीकडे असणारे निर्गुण , निराकार ब्रम्ह आहे तर दुसऱ्या टोकाला जड आणि निर्जिव भौतिक वस्तु आहेत ...!!!
वैदिक काळातील माणसाने अग्नी मध्ये आहुती टाकून भोग भोगण्याची ईच्छा करणे आणि एकविसाव्या शतकातील विज्ञान युगात वावरणार्या माणवाने विज्ञानाच्या साहाय्याने भोग भोगण्याची धडपड करणे , या दोन्ही मध्ये मुलतः फरक नाही . दोघेही अशाश्वताच्या क्षेत्रातच बुडी मारून जगतात . ईच्छा तृप्त करुन घेण्याचे मार्ग थोडे वेगवेगळे आहेत ईतकंच ...!!!
भौतिक सुखात केवळ रममाण न होता शाश्वत सुखावर ( ईश्वरावर ) लक्ष केंद्रित करा असे उपनिषदकार ऋषी सांगतात ...!!!
भय ईथले संपत नाही ...!!!
विश्वामधे सर्वव्यापीपणे कार्य करणारी माया निरनिराळ्या व्यक्ती मध्ये प्रकट होते तिला अविद्या म्हणतात , अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाचा , ईश्वराचा विसर होय ...!!!
देह व दृष्य जगत माणमाणसाला खरे वाटायला लागतात . अविद्या आनंदाचा लोप होय . अज्ञानाच्या प्रेरणेने माणूस लोपलेल्या आनंदासाठी दृष्यामधे चाचपडत राहतो . ज्याच्या मध्ये जे नाही त्याच्या मध्ये ते आहे असा भ्रम होणे हा अविद्येचा प्रभाव समजावा ...!!!
" मी आनंद स्वरूप आत्मा आहे , अर्थात आनंदाचे स्थान माझ्या तच आहे " हे विसरून " मी देह आहे व इंद्रियांच्या साहाय्याने मला आनंद मिळेल " या ठाम कल्पनेने वागणे ही अविद्येची करामत आहे . तिच्या अमलाखाली वावरणारा माणूस अनुभवाने शहाणा होत नाही म्हणून त्याच्या जीवनातील भय चिंता संपत नाही ...!!!
अविद्या हा माणसाचा मुळ स्वभाव नाही . त्याला दुःख नकोच असते , त्याचा मुळ स्वभाव दुःख शुन्यच आहे . जगात घडणार्या घटनांचे आकलन तो नीटपणे करुन घेत नाही म्हणून दुःख भोगतो . अविद्येचा नाश करणारी विद्या जरूर आहे ...!!!
उपनिषदांमधे परा व अपरा अशा दोन विद्या सांगितल्या आहेत . विद्या ही अनुभूती मधुन येत असते . अनुभूती चे तिन प्रकार आहेत . प्रत्यक्ष , परोक्ष आणि अपरोक्ष . दृष्य पदार्थांशी संयोग होऊन जी निर्माण होते ती प्रत्यक्ष अनुभूती . प्रत्यक्षावर संस्कार करुन बुध्दि जे अनुमान करते ती परोक्ष अनुभूती होय . विश्व रचनेचा विचार करणारी व त्या रचनेचे यथार्थ स्वरूप निश्चित करणारी अपरा विद्या प्रत्यक्ष व परोक्ष यावर अवलंबुन असते . निसर्गाचे सुक्ष्म , व्यापक व गुढ नियम ती शोधून काढते . पण तिने ही माणसाच्या ज्ञानाला पुर्णता येत नाही .
आत्मस्वरूपात लीन होऊन , म्हणजे च स्वस्वरूपमय होऊन आत्मस्वरुपाचे ज्ञान करुन घेण्याच्या अनुभूती ला अपरोक्ष अनुभूती असे म्हणतात . हीच तीं पराविद्या , सर्व विद्यांची सम्राज्ञी ...!!!
हीच परा विद्या जाणली असता सर्व काही जाणले जाते ...!!!
"यस्मीन विज्ञाते सर्व विज्ञात भवती ।"