मानव समाज हा नैसर्गिक रित्या निर्माण झाला आहे . प्रत्येक व्यक्ती चे स्वाभाविक गुणधर्म भिन्न असल्याने कोणत्याही उत्कृष्ट समाजव्यवस्थेत वर्ग असणे अपरीहार्य ठरते . भारतीय समाजाचा विचार करता स्थुलमनाने हे वर्ग चार आहेत.
ज्यांना जन्मानेच उत्तम बुध्दिमत्ता लाभलेली असते आणि या जगातल्या वस्तूंची आसक्ती कमी असते . अशा लोकांचा " ब्राह्मण वर्ग " होय .
ज्यांना जन्मापासुन उत्तम शरीर प्रकृती मिळालेली असते , अंगी निर्भयता , धैर्य व धाडस हे गुण असतात आणि ज्यांना ऐश्वर्य भोगण्याची हौस असते तो " क्षत्रिय वर्ग "
ज्यांना व्यवहार अधिक समजतो , हिशोबाची गुंतागूंत सहज लक्षात येते , ज्यांना आर्थिक उलाढाल करण्याची हौस असते तो " वैश्य वर्ग "
ज्यांना स्वाभाविक पणे बुध्दिमत्ता कमी लाभलेली असते , ऐश्वर्य मिळवण्याची हौस नसते , कला प्राप्त करण्याची पात्रता नसते , सांगितलेले काम करण्याची केवळ कुवत असते तो " शुद्र वर्ग "
कोणत्याही सुसंस्कृत जीवन जगणार्या समाजात अप्रत्यक्षपणे का होईना हे चार वर्ग असतात हे निर्विवाद सत्य आहे . त्यपैकी कोणताही वर्ग श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो . प्रत्येक वर्ग खुला असल्याने परस्परात परके पणाच्या भिंती नसतात .
उदा. ब्राह्मणाच्या घरात जर अगदी सामान्य बुध्दिचा मुलगा जन्माला आला तर तो शुद्र गणला जातो तसेच एखाद्या शुद्र कर्म करणार्या जर बुध्दिमान मुलगा जन्माला आला तर तो ब्राह्मण वर्गात जाऊ शकतो ...!!!
माणूस कोणत्याही वर्गातील असला तरी तो व्यक्ती या दृष्टीने समान असतो . म्हणून माणूस जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती आत्मज्ञानाची अधिकारी असल्याने ती कोणत्या वर्गात जन्मली हे महत्वाचे नाही . तत्वतः हे जरी खरे असले तरी व्यवहारात माणूस ईतक्या विवेकाने वागत नाही . तो स्वतः श्रेष्ठ कनिष्ठाच्या कल्पना निर्माण करुन वर्गांना जाती बनवून सामाजिक जीवन कुजवून टाकतो ...!!!
एकेकाळी ब्राह्मण वर्गाला समाजात फार श्रेष्ठ पणा मिळाला , नंतर क्षत्रिय वर्गाला पुढे वैश्य म्हणजे व्यापारी पैसे वाल्यांना मोठे पणा मिळाला . आता शुद्र म्हणजे कामगारांना अत्यंत महत्व मिळाले आहे .
कोणत्याही एकाच वर्गाला समाजात श्रेष्ठ पणा मिळाला मग तो ब्राह्मण असो की शुद्र , समाजातील समतोल नष्ट होऊन आपसातील द्वेष , मत्सर , वैर वाढत जाते . नवीन समस्या निर्माण होऊन सामाजिक जीवन त्रस्त होते .
उदा. सध्याच्या राष्ट्रीय समाजात डॉक्टर वर्ग , ईंजीनीअर वर्ग , वकील व कारकून वर्ग आढळतात . समजा या प्रत्येक वर्गाची वेगवेगळी जात निर्माण झाली तर त्यांचे सामाजिक जीवन किती हीन पातळीवर जाईल हे सांगायला हवे का ...???
" जन्मना जायते शुद्र: । संस्कारीतः द्वीज उच्चते ।।"
" चातुर्वर्ण्य मया सृष्टं । गुण-कर्म विभागश: ।। "
No comments:
Post a Comment