Friday, 2 September 2016

मराठा जातीच्या अधोगतीची कारणे

मराठा ....
होय ...मराठाच ...!!!
नुसते नाव ऐकले तरी दिल्लीतील शाही फौजा लेंडकं टाकत पळायच्या ... तुमानी ओल्या करायच्या ... संपूर्ण हिंदुस्थान आपल्या टापांच्या टप्प्यात घेऊन दौडणार्या भिमथडीच्या तट्टाना कधी थकवा जाणवत नव्हता ....त्यांच्या टापांचे आवाज ऐकून अरबी घोडे खिंकाळत चहु दिशेला चौखुर उधळायचे ....

     केवढा दरारा होता मराठ्यांचा ...
         सुर्याची दाहकता आणि चंद्राची शीतलता या मराठमंडळीत एकत्र नांदत होती ....
    मोहीमा उरकल्या की आपल्या गणगोतात , शेतीवाडीत आणि देवादी कार्यात मग्न होऊन जाणे ही मराठ्यांची पिढ्यापिढ्यांची जीवनशैली ...!!! 
     काळ बहलत गेला तशा सामाजिक आणि भौतिक गरजा व जाणीवाही बदलत गेल्या ...  हे सर्व बदलत असताना   एकेकाळी मोठे कर्तृत्व गाजवलेला मराठा समाज हवा तेवढा जागृत वा  सक्रिय राहीलेला दिसत नाही ...  !!!
काळाच्या ओघात सरंजमशाही, राजेशाही , सरदारकी गेली एवढेच काय तर कुळ कायद्याने वतनदारी देखिल नाममात्र शिल्लक राहिली ...!!!
     एवढे सर्व होत असताना म�राठा समाज मात्र आपली ऐतिहासिक जीवनशैली सोडायला तयार होताना दिसला नाही ...  वास्तवात यायचे भान आले नाही ...  पुर्वीचा रूबाब आणि बेदरकारपणा आता कुचकामी ठरतो आहे हे त्याच्या लक्षातच आले नाही ...!!!
      कुळकायद्याने जमीनींचा मालकी हक्क वहीवाटदाराकडे गेल्याने बर्याच मोठ्या प्रमाणावर मराठा समाज शेत जमीनीला मुकला ... उरलेल्या जमीनीत परंपरागत पध्दतीने शेती करून गुजराण करत बसला , आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात तो कमी पडत गेला .एकुणच शिक्षणा विषयीची आस मराठा समाजात  कमीच राहीली आणि अजूनही कमीच दिसते ...!!!  लोक संख्येचा विचार केला तर तौलनीक दृष्टीने उच्च शिक्षीतांचे प्रमाण इतर समाजाच्या मानाने मराठा जाती मध्ये कित्येक पटीने कमी दिसेल ... !!!
    परंपरागत शेती पध्दत त्यामुळे तुटपुंजी कमाई यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे दुरापास्त होत गेले , वैफल्य ग्रस्तता वाढत जाऊन आत्महत्या होऊ लागल्या , शेत जमीनी कवडीमोल भावात विकल्या गेल्या , आलेल्या रकमेतुन नवीन व्यवसाय करण्या ऐवजी खाण्या पिण्यात आणि गाडी बंगल्यात पैसा खर्च होत गेला , लग्नादी कार्यात वारेमाप उधळपट्टी होत राहीली ...  व्हायचा तो परिणाम झाला , बकालपणा वाढीस लागला ...!!!
         तर दुसरीकडे याउलट बदल घडत गेले ... ज्या समाजाकडे कुठली सर॑जामी , वतनदारी नव्हती तो जागृक राहीला , हातपाय हालवल्या शिवाय आपला निभाव लागणार नाही हे ओळखत शैक्षणिक मार्गावर जाऊन आपली प्रगती करून घेतली ... आतापर्यंत जे वंचित घटक म्हणून ओळखले जायचे त्यांनीही शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे हे तत्त्वज्ञान अंगिकारले आणि स्वमेहनतीने व कायदेशीर सवलतीने प्रगतीचा टप्पा गाठत स्वतःची वेगळी अशी ओळख तयार केली ...!!!
     एवढेच काय तर जे लोक यांच्या शेतावर मोलमजुरी करायचे त्यांच्या मुलांनीही उत्तम शिक्षण घेऊन उच्चपदाच्या नोकर्या मिळवुन यांचीच जमीन खरेदी केली व यांच्याच पुरातन वाड्याजवळ दिमाखदार बंगले उभे केले ...!!!
शिक्षणा शिवाय कुठलाही समाज जागरूक होत नाही  हे मराठा समाजाने आजहि मनावर घेतले आहे असे वाटत नाही ...!!!
        या सर्व कचाट्यातुन सुटलेल्या काही बोटावर मोजता येतील अशा मराठ्यांनी बहुसंख्यत्वाच्या जोरावर स्वतःची सत्ता स्थाने मजबूत करून घेतली , या कामी त्यांनी सर्व सामान्य मराठ्यांचा फक्त वापर करून घेतला , कृषी खात्याशी संबंधित मंत्री पदे उपभोगुनही सर्वसामान्य शेतकऱ्यांना वार्यावर सोडले  .  अनेक तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षण संस्था काढल्या , भरघोस शुल्क आकारून प्रवेश दिले ... यात सर्वसामान्य मराठा जातीचे विद्यार्थी किती असतात हा संशोधनाचा विषय होईल ...!!! मराठा समाजाच्या नेत्यांनी सत्ता आपल्या हातात ठेवली पण सर्व सामान्य मराठ्यांचा विकास होईल अशी कुठलीही ठोस धोरणे राबवल्याचे दिसत नाही , मतपेटी द्वारे स्वतःच्या तिजोर्या भरण्यासाठी मात्र भरपूर उपयोग करून घेतला ...!!!
       एकेकाळी ज्या मराठ्यांनी आपल्या हिंदूधर्माचे परमप्रिय भगवे निशाण मोठ्या दिमाखाने हिंदुस्थानभर मिरवले , धर्माची शान राखली ...
     तोच मराठा हा शब्द महाराष्ट्रातच आज चेष्टेचा विषय झाला आहे ,,,!!!
" शुर आम्ही सरदार आम्हाला ऍट्रॉसीटीची भिती "

एक - च्यायला मार्केट पडलं राव !!!
दुसरा - कुठाल्लं ? बाजार समीतीचं का ?
    असे विनोद मराठा समाजावर होऊ लागले आहेत .
     अनेक तथाकथित तत्वज्ञानी  हजारो वर्षांपूर्वीच्या कुळ्या मुळ्या शोधून मराठा जात वाचक शब्द नसुन प्रांत वाचक आहे असे सांगत आहेत , ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना सहकार्य केले ते सर्व मराठा आहेत ...!!!
    बरं यांचे म्हणने जर मान्य केले तर त्यांनी आपल्या दाखल्यावर हिंदू मराठा असे लावावे  , जसे आजचे मराठा लावतात , म्हणजे महाराष्ट्रात राहणारे सर्वच मराठा म्हणून ओळखले जातील  , आणि  जातीवाद ही नष्ट होईल ...!!!  पण ही धुर्त मंडळी तो मुर्खपणा करणार नाही  कारण यांना दुसर्याने फक्त तोडीच मराठा म्हणावे दाखल्यावर मात्र ते  त्यांचीव जात लावणार , कारण त्यातच त्यांचा स्वार्थ सामावला आहे ...!!! दाखल्यावर मराठा जात लावल्यावर आरक्षण जाईल ना मग ...!!!
     वंचित घटक आज कितीही श्रीमंत असूदे त्याला आरक्षण आहे मात्र बहुसंख्य मराठा आज दारीद्र्य रेषेखाली त्याला मात्र आरक्षण नाकारले जाते हे आजचे मानवतावादी राजकारण आहे ...!!!
        मराठा समाजानेही आज बदलत्या घडामोडी नुसार काळाची पावले ओळखून शैक्षणिक व राजकीय मार्गावर येऊन स्वतःची प्रगती करून घेतली पाहिजे ... कारण बहुसंख्य असलेला मराठा सबळ तर महाराष्ट्र सबळ , बहुसंख्य हिंदू सबळ तर अवघा हिंदुस्थान सबळ  असणार आहे ...!!!
आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यास जेंव्हा मराठा अग्रेसर राहील तेंव्हा अखंड महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानला सोनेरी दिवस येतील यात तिळमात्र शंका नाही ...!!!
रविंद्र किसनराव झांबरे
होळकरवाडी ( पुणे )

Wednesday, 3 August 2016

हिनस्ति दुर्वृत्ति: ईति हिंदू : ।

अशी कित्येक तुफानी वादळं हिंदुस्थानी संस्कृती मध्ये गपगार झाली , निवली आणि भ्रमित होऊन गेली ....
      त्या विषयी साहित्य सम्राट भालचंद्र नेमाडे काय म्हणतात ते पाहा ...!!!

 त्रिखंडाला लगाम घालून स्वार होणार्‍या अरबी तुमानी*
हिंदुभूमीच्या कर्कवृत्तावर वाळत घातल्या गंगेत धुऊन
ठुमर्‍या गझला गात विटक्या होउन फाटल्याभक्कम स्थिरावून ठेवलेल्या उंच मशिदींच्या गिर्रेबाज घुमटांवर 
गिरकी घेऊन मऊ होणार्‍या हिंदवी वार्‍यांना कोणी चाहता नाही
दिमाखात हिंदुभूमीच्या पोटावर खूर रोवून बसलेल्या इराणी मनोर्‍यांना
उलथून टाकले तर सावरायला शहेनशहा नाहीडबेऽ छाते ऽ दुरूस्त करून लटांबर पोसणार्‍या
किरट्या छात्यांत गुरमरणार्‍या रूहूला कुराणाला कुबड्या नाहीतबहुमताचा धूर ओकू लागली हिंदुमहासागरातली बेटं तर
हजार वर्षांच्या इतिहासाची सुरळी होऊन शिरू पहाते काजीमुल्लांच्या तुमानीतगल्लीबाजारात मोकाटणार्‍या मरतुकड्या गायींच्या
नुस्त्या हुंबरण्यानं कोलमडतात
अल्पसंख्यांक अरबी घोडे खिंकाळत गावोगावआणि तोफखाने चालवीत दख्खन बेचिराख करून
मोहल्ले पक्के रोवून बसलेला मुसलमान हाज उकरीत बसतो-
शिल्लक सांभाळीत जळक्या शेवचिवड्याच्या परातीत
त्याच्या दुकानात विस्तव फक्त धुमसती राख
बंबाशिवाय विझलेली. मागचं उद्ध्वस्त दुकान
करंट्या इतिहासाचं आठ शतकांच्या
न किसी की आँख का नूर हूँ म्हणत पंचनाम्याचा वैताग सोसत.- भालचंद्र नेमाडे.

Thursday, 21 July 2016

तमसो मा ज्योतीर्गमय...!!!

मानव समाज हा नैसर्गिक रित्या निर्माण झाला आहे . प्रत्येक व्यक्ती चे स्वाभाविक गुणधर्म भिन्न असल्याने कोणत्याही उत्कृष्ट समाजव्यवस्थेत वर्ग असणे अपरीहार्य ठरते . भारतीय समाजाचा विचार करता  स्थुलमनाने हे वर्ग चार आहेत.
ज्यांना जन्मानेच उत्तम बुध्दिमत्ता लाभलेली असते आणि या जगातल्या वस्तूंची आसक्ती कमी असते . अशा लोकांचा  " ब्राह्मण वर्ग " होय .
ज्यांना जन्मापासुन उत्तम शरीर प्रकृती मिळालेली असते , अंगी निर्भयता , धैर्य व धाडस हे गुण असतात आणि ज्यांना ऐश्वर्य भोगण्याची हौस असते तो " क्षत्रिय वर्ग "
         ज्यांना व्यवहार अधिक समजतो , हिशोबाची गुंतागूंत सहज लक्षात येते , ज्यांना आर्थिक उलाढाल करण्याची हौस असते तो " वैश्य वर्ग "
      ज्यांना स्वाभाविक पणे बुध्दिमत्ता कमी लाभलेली असते , ऐश्वर्य मिळवण्याची हौस नसते , कला प्राप्त करण्याची पात्रता नसते , सांगितलेले काम करण्याची केवळ कुवत असते तो  " शुद्र वर्ग "
        कोणत्याही सुसंस्कृत जीवन जगणार्या समाजात अप्रत्यक्षपणे का होईना हे चार वर्ग असतात हे निर्विवाद सत्य आहे . त्यपैकी कोणताही वर्ग श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो . प्रत्येक वर्ग खुला असल्याने परस्परात परके पणाच्या भिंती नसतात .
उदा. ब्राह्मणाच्या घरात जर अगदी सामान्य बुध्दिचा मुलगा जन्माला आला तर तो शुद्र गणला जातो तसेच एखाद्या शुद्र कर्म करणार्या जर बुध्दिमान मुलगा जन्माला आला तर तो ब्राह्मण वर्गात जाऊ शकतो ...!!!
     माणूस कोणत्याही वर्गातील असला तरी तो व्यक्ती या दृष्टीने समान असतो . म्हणून माणूस जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती आत्मज्ञानाची अधिकारी असल्याने ती कोणत्या वर्गात जन्मली हे महत्वाचे नाही . तत्वतः हे जरी खरे असले तरी व्यवहारात माणूस ईतक्या विवेकाने वागत नाही . तो स्वतः श्रेष्ठ कनिष्ठाच्या कल्पना निर्माण करुन वर्गांना जाती बनवून सामाजिक जीवन कुजवून टाकतो ...!!!
      एकेकाळी ब्राह्मण वर्गाला समाजात फार श्रेष्ठ पणा मिळाला , नंतर क्षत्रिय वर्गाला पुढे वैश्य म्हणजे व्यापारी पैसे वाल्यांना मोठे पणा मिळाला . आता शुद्र म्हणजे कामगारांना अत्यंत महत्व मिळाले आहे .
     कोणत्याही एकाच वर्गाला समाजात श्रेष्ठ पणा मिळाला मग तो ब्राह्मण असो की शुद्र  , समाजातील समतोल नष्ट होऊन आपसातील द्वेष , मत्सर , वैर वाढत जाते . नवीन समस्या निर्माण होऊन सामाजिक जीवन त्रस्त होते .
उदा. सध्याच्या राष्ट्रीय समाजात डॉक्टर वर्ग , ईंजीनीअर वर्ग , वकील व कारकून वर्ग आढळतात . समजा या प्रत्येक वर्गाची वेगवेगळी जात निर्माण झाली तर त्यांचे सामाजिक जीवन किती हीन पातळीवर जाईल हे सांगायला हवे का ...???

" जन्मना जायते शुद्र: । संस्कारीतः द्वीज उच्चते ।।"

" चातुर्वर्ण्य मया सृष्टं । गुण-कर्म विभागश: ।। "

या सुखा कारणे ...!!!

शाश्वताचा शोध घेणे हेच माणसाच्या बुध्दिचे वैशिष्ट्य आहे . चिंतनशीलता हा या विश्वाचा उगम आहे . या विश्वाला दोन टोके आहेत , एका टोकाला सर्व मानवांच्या कल्पना पलीकडे असणारे निर्गुण , निराकार ब्रम्ह आहे तर दुसऱ्या टोकाला जड आणि निर्जिव भौतिक वस्तु आहेत ...!!!
         वैदिक काळातील माणसाने अग्नी मध्ये आहुती टाकून भोग भोगण्याची ईच्छा करणे आणि एकविसाव्या शतकातील विज्ञान युगात वावरणार्या माणवाने विज्ञानाच्या साहाय्याने भोग भोगण्याची धडपड करणे , या दोन्ही मध्ये मुलतः फरक नाही . दोघेही अशाश्वताच्या क्षेत्रातच बुडी मारून जगतात . ईच्छा तृप्त करुन घेण्याचे मार्ग थोडे वेगवेगळे आहेत ईतकंच ...!!!
भौतिक सुखात केवळ रममाण न होता शाश्वत सुखावर  ( ईश्वरावर ) लक्ष केंद्रित करा असे उपनिषदकार ऋषी सांगतात ...!!!

भय ईथले संपत नाही ...!!!

विश्वामधे सर्वव्यापीपणे कार्य करणारी माया निरनिराळ्या व्यक्ती मध्ये प्रकट होते तिला अविद्या म्हणतात , अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाचा , ईश्वराचा विसर होय ...!!!
देह व दृष्य जगत माणमाणसाला खरे वाटायला लागतात . अविद्या आनंदाचा लोप होय  . अज्ञानाच्या प्रेरणेने माणूस लोपलेल्या आनंदासाठी दृष्यामधे चाचपडत राहतो . ज्याच्या मध्ये जे नाही त्याच्या मध्ये ते आहे असा भ्रम होणे हा अविद्येचा प्रभाव समजावा ...!!!
       " मी आनंद स्वरूप आत्मा आहे , अर्थात आनंदाचे स्थान माझ्या तच आहे "  हे विसरून   " मी देह आहे व इंद्रियांच्या साहाय्याने मला आनंद मिळेल " या ठाम कल्पनेने वागणे ही अविद्येची करामत आहे . तिच्या अमलाखाली वावरणारा माणूस अनुभवाने शहाणा होत नाही म्हणून त्याच्या जीवनातील भय चिंता संपत नाही ...!!!
        अविद्या हा माणसाचा मुळ स्वभाव नाही . त्याला दुःख नकोच असते , त्याचा मुळ स्वभाव दुःख शुन्यच आहे . जगात घडणार्या घटनांचे आकलन तो नीटपणे करुन घेत नाही म्हणून दुःख भोगतो .  अविद्येचा नाश करणारी विद्या जरूर आहे ...!!!
      उपनिषदांमधे परा व अपरा अशा दोन विद्या सांगितल्या आहेत . विद्या ही अनुभूती मधुन येत असते . अनुभूती चे तिन प्रकार आहेत . प्रत्यक्ष , परोक्ष आणि अपरोक्ष . दृष्य  पदार्थांशी संयोग होऊन जी निर्माण होते ती प्रत्यक्ष अनुभूती . प्रत्यक्षावर संस्कार करुन बुध्दि जे अनुमान करते ती परोक्ष अनुभूती होय . विश्व रचनेचा विचार करणारी व त्या रचनेचे यथार्थ स्वरूप निश्चित करणारी अपरा विद्या प्रत्यक्ष व परोक्ष यावर अवलंबुन असते . निसर्गाचे सुक्ष्म , व्यापक व गुढ नियम ती शोधून काढते . पण तिने ही माणसाच्या ज्ञानाला पुर्णता येत नाही .
      आत्मस्वरूपात लीन होऊन , म्हणजे च स्वस्वरूपमय होऊन आत्मस्वरुपाचे ज्ञान करुन घेण्याच्या अनुभूती ला अपरोक्ष अनुभूती असे म्हणतात . हीच तीं पराविद्या , सर्व विद्यांची सम्राज्ञी ...!!!
       हीच परा विद्या जाणली असता सर्व काही जाणले जाते ...!!!

  "यस्मीन विज्ञाते सर्व विज्ञात भवती ।"

Sunday, 24 January 2016

जातीयतेचे भुत , मिडिया आणि होणारे राजकारण ........ सध्या सोशल मिडिया आणि ईतर माध्यमातून येणाऱ्या मॄत्युच्या,पुरस्काराच्या आणि तत्सम बातम्यातुन सलंग्न व्यक्तीची जात शोधुन त्यावर किळसवाणे राजकारण होत आहे... तेंव्हा ईथुन पुढे शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील बातम्या अशा असल्या तर नवल वाटायला नको ......!!! नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार बेलदार वाडीतील चांभाराच्या शेताजवळील एका कुणब्याच्या मालकीच्या विहीरीत एका तरूणाचा मॄतदेह सापडला असुन तो एका महाराचा (आत्ता बौद्ध) आहे असे त्याच्या कुंभाराच्या मित्राने त्याच्या लोहाराच्या मित्राचा हवाला देऊन आमच्या धनगराच्या वार्ताहाराला नाव्ह्याच्या फोटोग्राफर समोर सांगितले . विहीरीचा कुणबी मालक हे बेनं आमच्या विहीरीत का कडमडलं म्हणुन जाब विचारायला गावकुसाबाहेर महारवाड्यावर आपल्या सुताराच्या ,माळ्याच्या आणि वाण्याच्या मित्रांबरोबर जात असताना त्याच्या मुलाने त्यांना नाम्या व्हलाराचा हवाला देऊन आडवले( याच नाम्या व्हलाराने कुणबी हे क्षुद्रच आहेत हे समस्त कुणब्यांना सांगायचा प्रयत्न केला होता , आणि समस्त कुणब्यांच्या पोरांकडुन आपली बिन पाण्याने धुलाई करून घेतली आणि पोरांच्या माग पोलीसांचं झेंगाट लाऊन दिलं होतं) आणि मनुवादी, भटाळलेला अशी उपाधि मिळण्या आधी घरी पोहच केले. तरीही हा कुणबी आधीच भटाळलेला असल्याने आपल्या विहीरीत भुतबाधा होईल या भयाने गावातील एका बामनाकडे विचारपुस करायला जातो तर बामन आपल्या शेंडीची गाठ अधिक घट्ट करत म्हणतो कालच माझ्या अमेरिकेत स्थिरस्थावर झालेल्या मुलाचा फोन आला होता " आता हे सर्व उद्योग बंद करा , भटगिरीची आणि मंदिरातील आरक्षणाची आपल्याला गरज नाही , वेळोवेळी मी पैसे पाठवील , मी ईकडे अनिस मधे दाखल होऊन येथील पादर्यांना पिडत आहे , तुम्ही तेथील अनिष्यांना दारावरूनच कटवत चला, गणपतीला येईल मी " दाढी करता करता आमच्या शिंपी वार्ताहाराला नाव्ह्याकडुन मिळालेल्या आतल्या बातमीनुसार या मॄत महाराचे (बौद्ध) गावातील हिन्दु - मातंग मुलीशी झेंगाट होते, लग्नाची वेळ आल्यावर मुलगी बौद्ध धर्म स्विकारत नाही हे पाहून बौद्ध महाराने लग्नास नकार दिला म्हणून मुलीच्या भटाळलेल्या भावाने बौद्ध महाराच्या मुळनिवासी मुसलमान मित्रालाच सुपारी देऊन त्याचा मड्डर केला आणि कुणब्याच्या विहीरीजवळील म्हसोबा नावाचा शेंदूर फासलेला दगड त्याच्या कंबरेला बांधुन विहीरीत टाकला ...!!! अधिक तपास आपले संविधान रक्षक बहूजनवादी बीग्रेड पथक करत आहे ...!!!