Saturday, 19 June 2021

गौरीहरा दिनानाथा

🌹स्वर-सुधीर फडके🌹
ॐनम:शिवाय,ॐनम:शिवाय,
ॐनम:शिवाय 
गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय
गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय

रुसू नको माझ्या देवा, तूच माझी मा..य
रुसू नको माझ्या देवा, तूच माझी मा..य
गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय

गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय
ॐनम:शिवाय,ॐनम:शिवाय,
ॐनम:शिवाय ...

दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत
एकरूप आपण दोघे, दूध आणि साय
एकरूप आपण दोघे, दूध आणि साय

दयावंत तुजला म्हणती,थोर थोर संत
दयावंत तुजला म्हणती,थोर थोर संत
ॐनम:शिवाय,ॐनम:शिवाय,
ॐनम:शिवाय 

गौरीहरा दीनानाथा,धरीन तुझे पाय
रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय
गौरीहरा दीनानाथा,धरीन तुझे पाय

ॐनम:शिवाय,ॐनम:शिवाय,
ॐनम:शिवाय ...

तुला शोधुनिया देवा,कैक लोक थकले
तुझा ठाव न कळे देवा,करू तरी का..य
तुझा ठाव न कळे देवा,करू तरी का..य

तुला शोधुनिया देवा,कैक लोक थकले
तुला शोधुनिया देवा,कैक लोक थकले

ॐनम:शिवाय,ॐनम:शिवाय,
ॐनम:शिवाय 
गौरीहरा दीनानाथा,धरीन तुझे पाय
गौरीहरा दीनानाथा,धरीन तुझे पाय
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏

नको भव्य वाडा

❤तुझा प्रेमवेडा❤
नको भव्य वाडा....
नको गाडी-घोडा....
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा,नको गाडी-घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा,नको गाडी-घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
🌷स्वर-मोहम्मद रफी🌷
तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी....
तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी
तुला या दिलाची येईल कसोटी
येईल कसोटी....
बेहोश मन हे, तुझा त्यास ओढा
अनाडी ,असे मी ,तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा,नको गाडी-घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
मला वाचु दे ना तुझी नेत्रभाषा....
मला वाचु दे ना तुझी नेत्रभाषा
किती काळ सोसू,उरी मी निराशा
उरी मी निराशा....
बेचै..न हृदया तू दे धीर थोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा,नको गाडी-घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
नको भव्य वाडा,नको गाडी-घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
अनाडी असे मी तुझा......
🙏 धन्यवाद 🙏

Wednesday, 16 June 2021

नववधू प्रिया मी

🌷लता मंगेशकर🌷
नववधू प्रिया मी बावरते
नववधू प्रिया मी बावरते
लाजते पुढे सरते, फिरते
नववधू प्रिया मी बावरते
नववधू प्रिया मी बावरते...
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
कळे मला तू..प्राण सखा जरी
कळे तूच आधार सुखा जरी
कळे मला तू.. प्राण सखा जरी
कळे तूच आ..धार सुखा जरी
तूज वाचूनि संसार फुका जरी ई ई ई
मन जवळ यावया गांगरते
नववधू प्रिया मी बावरते...
मला येथला,लागला लळा
सासरी निघता,दाटतो गळा
मला येथला,लागला लळा
सासरी निघता,दाटतो गळा
बाग बगीचा येथला मळा आ आ आ 
सोडीता कसे,मन चरचरते
नववधू प्रिया मी बावरते...
जीव मनीचा,मनी तळमळे
वाटे बंधन,करुनि मोकळे
जीव मनीचा,मनी तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे,तुज जवळ पळे ऐ ऐ ऐ
परि काय करु ? उरी धडधडते
नववधू प्रिया मी बावरते...
आता तुच भय,लाज हरी रे
धीर देऊनि,ने नवरी रे
आता तुच भय,लाज हरी रे
धीर देऊनि,ने नवरी रे
भरो..त भरतील नेत्र जरी रे ऐ ऐ ऐ
कळ,पळभर मात्र खरे घर ते
कळ,पळभर मात्र खरे घर ते
लाजते पुढे सरते, फिरते
नववधू प्रिया मी बावरते
नववधू प्रिया मी बावरते
🙏 धन्यवाद 🙏

आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी

  🙏आई🙏
आ..ई, आ..ई..
आ..ई,...आ..ई,
आ..ई, आ..ई,
आई म्हणोनी कोणी..
आईस हाक मारी..
ती हाक येइ कानी..
मज होय शोककारी..
आ..ई, आ..ई..
आ..ई, आ..ई..
*स्वर-आशा भोसले*
नोहेच हाक, माते..
मारी कुणी कुठारी..
आई कुणा म्हणू मी
आई घरी न दारी..
आ..ई, आ..ई..
आ..ई, आ..ई..
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
चारा मुखी पिलांच्या..
चिमणी हळूच देई..
गोठ्यात वासरांना..
ह्या चाटतात गाई..
वात्सल्य हे बघुनी..
व्याकूळ जीव होई..
आ..ई, आ..ई..
आ..ई, आ..ई..
😕😕😕😕
हा हा आ..
येशील तू घराला
परतून केधवा गे
रुसणार मी न आता
जरी बोलशील रागे ऐ ऐ
रुसणार मी न आता..
जरी बोलशील रागे..
आ..ई, आ..ई..
आई कुणा म्हणू मी
आई घरी न दारी
स्वामी तिन्ही जगांचा
आईविना भिकारी
आ..ई, आ..ई..
आ..ई, आ..ई 
आ..ई,.....आ..ई
    🌹आई🌹
🙏🙏🙏🙏🙏

राधा कृष्णावरी भाळली

राधा कृष्णावरी भाळली, 
राधा कृष्णावरी भाळली, 
कुजबुज उठली गोकुळी
कुजबुज उठली गोकुळी
राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली

*स्वर-आशा भोसले*
अमृतवृक्षी फुलला मोहोर, 
कोकीळकंठी फुटला सुस्वर 
अमृतवृक्षी फुलला मोहोर, 
कोकीळकंठी फुटला सुस्वर

कुंजवानातून, फुलाफुलांतून...
कुंजवानातून, फुलाफुलांतून, 
नवलकथा दरवळली
राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली

*सौजन्य-रविंद्र झांबरे*
वायू वेगे सुगंधवा..र्ता, 
कालिंदीच्या कानी पडता 
वायू वेगे सुगंधवा..र्ता, 
कालिंदीच्या कानी पडता

हरीभक्तीची ओढ तियेची...
हरीभक्तीची ओढ तियेची, 
नीलजळी थयथयली
राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली
💃🕺💃🕺💃🕺

अमर प्रीतीचे गीत लाघवी, 
हरी अधरीची वेणू वाजवी
अमर प्रीतीचे गीत लाघवी, 
हरी अधरीची वेणू वाजवी

राधामोहन बघण्या मिलन...
राधामोहन बघण्या मिलन, 
इंद्रपुरी अवतरली
राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली
कुजबुज उठली गोकुळी
कुजबुज उठली गोकुळी

राधा कृष्णावरी भाळली,
राधा कृष्णावरी भाळली
राधा कृष्णावरी भाळली
धन्यवाद 🙏

पोरी पिंगा ग पोरी पिंगा

🌷स्वर-उषा मंगेशकर🌷
१+२)हं हं हं...हं हं हं...हं हं हं..हं हं हं
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा 
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
१)फेटा बांधल्याला भाऊ माझा ग 
जावई तुझा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
झोप चाळिवली पोरी पिंगा 
हं हं हं...हं हं हं
२)शालू नेसल्याली भैन माझी ग 
सून तुझी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
मागं घालिवली पोरी पिंगा 
१+२)पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा
१)भाऊ माझा ग, शोभं राजा ग, 
अग जा जा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
मला बोलिवली पोरी पिंगा 
हं हं हं...हं हं हं
२)तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, 
रूप हेकणं ग पोरी पिंगा
भैन माझी ग लेक इंद्राची 
कोर चंद्राची पोरी पिंगा 
१+२)पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा
१)तुझ्या भैनीचं नाक नकटं ग 
त्वांड चपटं ग पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा 
पळती थरारा सारे पिंगा 
हं हं हं...हं हं हं
२)भाऊ तुझा ग भितो झुरळाला, 
काळ्या उंदराला पोरी पिंगा
भैन माझी ग जशी कोकिळा 
गाते मंजुळा पोरी पिंगा 
१+२)पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा
१)तुझ्या भैनीचं काय नरडं ग 
कावळं वरडं ग पोरी पिंगा
अशा भैनीला कोण आणणार 
कशी नांदणार पोरी पिंगा 
हं हं हं...हं हं हं
२)भैन माझी ग जाई बावरून 
घेई सावरून पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, 
लुगडं नेशिवलं पोरी पिंगा 
१+२)पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा 
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, 
रात जागवली पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏

गंगा जमुना दोघ्या बहिणी

💃भन्नाट कोळीगीत🕺
🚩मराठी बाणा🚩
💃🕺💃🌹💃🕺💃
गंगा-जमुना दोघ्या बयनी 
गो पानी झुलझुल व्हाय
गंगा-जमुना दोघ्या बयनी 
गो पानी झुलझुल व्हाय
गंगा-जमुना दोघ्या बयनी 
गो पानी झुलझुल व्हाय
गंगा-जमुना दोघ्या बयनी 
गो पानी झुलझुल व्हाय
हे,दर्याकिनारी एक बंगला 
गो पानी जाय-जुई-जाय
दर्याकिनारी एक बंगला 
गो पानी जाय-जुई-जाय
दर्याकिनारी एक बंगला 
गो पानी जाय-जुई-जाय
दर्याकिनारी एक बंगला 
गो पानी जाय-जुई-जाय
माशांनी मारलाय दणका 
गो पानी तलाला जाय
माशांनी मारलाय दणका 
गो पानी तलाला जाय
माशांनी मारलाय दणका 
गो पानी तलाला जाय
माशांनी मारलाय दणका 
गो पानी तलाला जाय
*स्वर-बालकराम वरलीकर व मंडळी*
कोल्याची पोर एक शोभेची तया उबीच हाय
कोल्याची पोर एक शोभेची तया उबीच हाय
कोल्याची पोर एक शोभेची तया उबीच हाय
कोल्याची पोर एक शोभेची तया उबीच हाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्‍यानी जाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्‍यानी जाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्‍यानी जाय
नेसली पैठण सारी गो पदर वार्‍यानी जाय
अंगान्‌ चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
अंगान्‌ चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
अंगान्‌ चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
अंगान्‌ चोली गजनीची पोरी ठुमकत जाय
हे, नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय
नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय
नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय
नाखवा गेलाय्‌ डोलिला पोरी करशील काय
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर,
नवरीचा बापुस कवटा चोर
आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर, 
नवरीचा बापुस कवटा चोर
आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर, 
नवरीचा बापुस कवटा चोर
आंब्याच्या डांगलीवर बसलाय्‌ मोर, 
नवरीचा बापुस कवटा चोर....
करवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या 
म्हायेरा जावालं सांजवलं
करवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या 
म्हायेरा जावालं सांजवलं
करवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या 
म्हायेरा जावालं सांजवलं
करवल्या खुरतान आंब्याच्या डांगल्या 
म्हायेरा जावालं सांजवलं....
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
आंब्याची डांगली हलविली 
नवर्‍याने नवरीला पलविली
💃🕺💃🌹💃🕺💃