Tuesday, 1 June 2021

नाकी डोळी छान रंग

🌹राम राम गंगाराम🌹
        🌹लावणी🌹
आ आ आ 
नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान 
नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान 
त्यात आलं तरुणपण मिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
🌹स्वर-उषा मंगेशकर🌹
जाऊ चला हो रंग महाली 
शेजेवरती फुले पसरली 
मर्जी तुम्हावर बहाल केली हो 
मर्जी तुम्हावर बहाल केली...
नटून मी आले बघू नका वरखाली 
गगग धडा पहिला गिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
तुमच्या संग होऊन दंग उधळूया हो प्रितीत रंग 
मी राधा तुम्ही माझे श्रीरंग 
मी राधा तुम्ही माझे श्रीरंग...
गोड गोड पावा मला वाजवून दावा 
मनातली विच्छा माझी पुरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
💃💃💃🌹💃💃💃
तळमळते मज चैन पडेना 
डोळ्यावरची धुंदी उडेना 
जवळ असुनही काही घडेना 
जवळ असुनही काही घडेना...
सुटलं गं वारं आज थंडगार गार 
खेळात या हो मला हरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
कुणीतरी न्याहो मला फिरवायला 
🙏धन्यवाद🙏

No comments:

Post a Comment