Friday, 14 May 2021
Friday, 2 September 2016
मराठा जातीच्या अधोगतीची कारणे
मराठा ....
होय ...मराठाच ...!!!
नुसते नाव ऐकले तरी दिल्लीतील शाही फौजा लेंडकं टाकत पळायच्या ... तुमानी ओल्या करायच्या ... संपूर्ण हिंदुस्थान आपल्या टापांच्या टप्प्यात घेऊन दौडणार्या भिमथडीच्या तट्टाना कधी थकवा जाणवत नव्हता ....त्यांच्या टापांचे आवाज ऐकून अरबी घोडे खिंकाळत चहु दिशेला चौखुर उधळायचे ....
केवढा दरारा होता मराठ्यांचा ...
सुर्याची दाहकता आणि चंद्राची शीतलता या मराठमंडळीत एकत्र नांदत होती ....
मोहीमा उरकल्या की आपल्या गणगोतात , शेतीवाडीत आणि देवादी कार्यात मग्न होऊन जाणे ही मराठ्यांची पिढ्यापिढ्यांची जीवनशैली ...!!!
काळ बहलत गेला तशा सामाजिक आणि भौतिक गरजा व जाणीवाही बदलत गेल्या ... हे सर्व बदलत असताना एकेकाळी मोठे कर्तृत्व गाजवलेला मराठा समाज हवा तेवढा जागृत वा सक्रिय राहीलेला दिसत नाही ... !!!
काळाच्या ओघात सरंजमशाही, राजेशाही , सरदारकी गेली एवढेच काय तर कुळ कायद्याने वतनदारी देखिल नाममात्र शिल्लक राहिली ...!!!
एवढे सर्व होत असताना मराठा समाज मात्र आपली ऐतिहासिक जीवनशैली सोडायला तयार होताना दिसला नाही ... वास्तवात यायचे भान आले नाही ... पुर्वीचा रूबाब आणि बेदरकारपणा आता कुचकामी ठरतो आहे हे त्याच्या लक्षातच आले नाही ...!!!
कुळकायद्याने जमीनींचा मालकी हक्क वहीवाटदाराकडे गेल्याने बर्याच मोठ्या प्रमाणावर मराठा समाज शेत जमीनीला मुकला ... उरलेल्या जमीनीत परंपरागत पध्दतीने शेती करून गुजराण करत बसला , आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात तो कमी पडत गेला .एकुणच शिक्षणा विषयीची आस मराठा समाजात कमीच राहीली आणि अजूनही कमीच दिसते ...!!! लोक संख्येचा विचार केला तर तौलनीक दृष्टीने उच्च शिक्षीतांचे प्रमाण इतर समाजाच्या मानाने मराठा जाती मध्ये कित्येक पटीने कमी दिसेल ... !!!
परंपरागत शेती पध्दत त्यामुळे तुटपुंजी कमाई यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे दुरापास्त होत गेले , वैफल्य ग्रस्तता वाढत जाऊन आत्महत्या होऊ लागल्या , शेत जमीनी कवडीमोल भावात विकल्या गेल्या , आलेल्या रकमेतुन नवीन व्यवसाय करण्या ऐवजी खाण्या पिण्यात आणि गाडी बंगल्यात पैसा खर्च होत गेला , लग्नादी कार्यात वारेमाप उधळपट्टी होत राहीली ... व्हायचा तो परिणाम झाला , बकालपणा वाढीस लागला ...!!!
तर दुसरीकडे याउलट बदल घडत गेले ... ज्या समाजाकडे कुठली सर॑जामी , वतनदारी नव्हती तो जागृक राहीला , हातपाय हालवल्या शिवाय आपला निभाव लागणार नाही हे ओळखत शैक्षणिक मार्गावर जाऊन आपली प्रगती करून घेतली ... आतापर्यंत जे वंचित घटक म्हणून ओळखले जायचे त्यांनीही शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे हे तत्त्वज्ञान अंगिकारले आणि स्वमेहनतीने व कायदेशीर सवलतीने प्रगतीचा टप्पा गाठत स्वतःची वेगळी अशी ओळख तयार केली ...!!!
एवढेच काय तर जे लोक यांच्या शेतावर मोलमजुरी करायचे त्यांच्या मुलांनीही उत्तम शिक्षण घेऊन उच्चपदाच्या नोकर्या मिळवुन यांचीच जमीन खरेदी केली व यांच्याच पुरातन वाड्याजवळ दिमाखदार बंगले उभे केले ...!!!
शिक्षणा शिवाय कुठलाही समाज जागरूक होत नाही हे मराठा समाजाने आजहि मनावर घेतले आहे असे वाटत नाही ...!!!
या सर्व कचाट्यातुन सुटलेल्या काही बोटावर मोजता येतील अशा मराठ्यांनी बहुसंख्यत्वाच्या जोरावर स्वतःची सत्ता स्थाने मजबूत करून घेतली , या कामी त्यांनी सर्व सामान्य मराठ्यांचा फक्त वापर करून घेतला , कृषी खात्याशी संबंधित मंत्री पदे उपभोगुनही सर्वसामान्य शेतकऱ्यांना वार्यावर सोडले . अनेक तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षण संस्था काढल्या , भरघोस शुल्क आकारून प्रवेश दिले ... यात सर्वसामान्य मराठा जातीचे विद्यार्थी किती असतात हा संशोधनाचा विषय होईल ...!!! मराठा समाजाच्या नेत्यांनी सत्ता आपल्या हातात ठेवली पण सर्व सामान्य मराठ्यांचा विकास होईल अशी कुठलीही ठोस धोरणे राबवल्याचे दिसत नाही , मतपेटी द्वारे स्वतःच्या तिजोर्या भरण्यासाठी मात्र भरपूर उपयोग करून घेतला ...!!!
एकेकाळी ज्या मराठ्यांनी आपल्या हिंदूधर्माचे परमप्रिय भगवे निशाण मोठ्या दिमाखाने हिंदुस्थानभर मिरवले , धर्माची शान राखली ...
तोच मराठा हा शब्द महाराष्ट्रातच आज चेष्टेचा विषय झाला आहे ,,,!!!
" शुर आम्ही सरदार आम्हाला ऍट्रॉसीटीची भिती "
एक - च्यायला मार्केट पडलं राव !!!
दुसरा - कुठाल्लं ? बाजार समीतीचं का ?
असे विनोद मराठा समाजावर होऊ लागले आहेत .
अनेक तथाकथित तत्वज्ञानी हजारो वर्षांपूर्वीच्या कुळ्या मुळ्या शोधून मराठा जात वाचक शब्द नसुन प्रांत वाचक आहे असे सांगत आहेत , ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना सहकार्य केले ते सर्व मराठा आहेत ...!!!
बरं यांचे म्हणने जर मान्य केले तर त्यांनी आपल्या दाखल्यावर हिंदू मराठा असे लावावे , जसे आजचे मराठा लावतात , म्हणजे महाराष्ट्रात राहणारे सर्वच मराठा म्हणून ओळखले जातील , आणि जातीवाद ही नष्ट होईल ...!!! पण ही धुर्त मंडळी तो मुर्खपणा करणार नाही कारण यांना दुसर्याने फक्त तोडीच मराठा म्हणावे दाखल्यावर मात्र ते त्यांचीव जात लावणार , कारण त्यातच त्यांचा स्वार्थ सामावला आहे ...!!! दाखल्यावर मराठा जात लावल्यावर आरक्षण जाईल ना मग ...!!!
वंचित घटक आज कितीही श्रीमंत असूदे त्याला आरक्षण आहे मात्र बहुसंख्य मराठा आज दारीद्र्य रेषेखाली त्याला मात्र आरक्षण नाकारले जाते हे आजचे मानवतावादी राजकारण आहे ...!!!
मराठा समाजानेही आज बदलत्या घडामोडी नुसार काळाची पावले ओळखून शैक्षणिक व राजकीय मार्गावर येऊन स्वतःची प्रगती करून घेतली पाहिजे ... कारण बहुसंख्य असलेला मराठा सबळ तर महाराष्ट्र सबळ , बहुसंख्य हिंदू सबळ तर अवघा हिंदुस्थान सबळ असणार आहे ...!!!
आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यास जेंव्हा मराठा अग्रेसर राहील तेंव्हा अखंड महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानला सोनेरी दिवस येतील यात तिळमात्र शंका नाही ...!!!
रविंद्र किसनराव झांबरे
होळकरवाडी ( पुणे )